महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. उद्यापासून आपण कोकण दौरा सुरू करणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली.
कोणताही लढा हा प्रस्थपितांविरोधातच असतो. प्रस्थापितांविरोधातील लढ्याला यश आलेले १९९५ ते १९९९ या काळात सर्वांनीच पहिले आहे. त्यामुळे विशिष्ट एका पक्षाच्या असलेल्या बालेकिल्ल्याला धक्का बसून तो हलत असतो आणि ते यापुढेही असे बालेकिल्ले हलतील असे म्हणत राज ठाकरे यांनी निवडणुकांसंदर्भांत विरोधकांना इशारा दिला आहे. प्रत्येक पक्षाचे अंतर्गत काम हे सुरूच असते पण प्रत्येकवेळी ते जाहीरपणे सांगायलाच हवे असे नाही. तसे आमच्या पक्षाचे सुद्धा काम सुरु आहे.
सीमा प्रश्नावरही राज ठाकरेंचे विधान
सीमा प्रश्न हा अचानक कसा वर येतो. म्हणजेच इतर कोणत्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष कोणाला वळवायचे आहे का? ही बाब लक्षात घेणे जरजेचे आहे. पण या सर्व गोष्टी अचानक कशा समोर येतात ते काळत नाही. असे राज ठाकरे म्हणाले.