'भारत' देश आयसीयूमध्ये, राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून टीका

सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (09:44 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धनत्रयोदशी निमित्तानं देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. याचित्राद्वारे त्यांनी भाजपाला चांगलेच फटकारले आहे. हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव 'धन्वंतरी' ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात!,असे सांगत राज ठाकरे यांनी 'भारत' देशाला आयसीयूमध्ये दाखवले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर !, अशा शब्दांत त्यांनी थेट भाजपा सरकारवर टीका केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख प्रवेश मिळणार का ?