Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जान है तो जहान है’, मोदींच्या वक्तव्याची राजेश टोपेंनी आठवण करुन देत

rajesh rope
मुंबई , मंगळवार, 11 जानेवारी 2022 (07:51 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करताना नेहमी ‘जान है तो जहान है’, असे बोलतात, त्यामुळे जीव आहे, तर सर्व आहे, चंद्रकांत पाटलांनी हे लक्षात घ्यावे या भाषेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे. राज्यातली रुग्णसंख्या कमी झाली की निर्बंध शिथील करता येतील. सध्या रुग्णसंख्येतील वाढ मोठी आहे त्यामुळे निर्बंध घालणे गरजेचे आहे, असेही टोपे म्हणाले आहे. आज आपण संपूर्ण बंद नाही केलं, काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन बंद केल्याचे टोपे यांनी सांगितलं.
 
राज्यातल्या निर्बंधावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती, त्याला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर देताना मोदींच्या वाक्याची आठवण करून दिली आहे. सततच्या लॉकडाऊनच्या जाचाला कंटाळून पुण्यातल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी कळली. शिथिल न झालेले निर्बंध आणि नोकरी गमावून बसल्यामुळे तरुणांना आपलं आयुष्य संपवावं लागत आहे. मात्र सरकारने निर्बंधांचा कळस गाठला असून नागरिकांचा गळा घोटणं सुरूच ठेवलं आहे. मी अनेकदा हे सांगितलं होतं की, निर्बंध शिथिल करा, लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करा आणि जनजीवन सुरूच ठेवा. मात्र सरकारने जनतेचा काहीही विचार केला नाही आणि अशा कित्येक तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन; तरुणाला आली आंदोलनाची धमकी