यवतमाळ अतिवृष्टीने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे त्यामुळे या परिस्थितीत मनसे ने एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांसाठी *राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त दत्तक योजना* सुरु करण्याची सुरुवात केली आहे यात रब्बी पिकासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे यात बियाणे खत आणि आणि फवारणी औषध आणि आर्थिक मदत सुध्दा मनसे कडून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येईल असे मनसे चे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सांगितले आहे .
त्यामुळे अतिवृष्टी ने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नक्कीच ही योजना आधार ठरू शकते आता वणी झरी मारेगाव या तीन तालुक्यात ही योजना सुरू करण्यात येईल आणि त्यासाठी शेतकऱ्यांनकडून अर्ज मागविण्यात आले आहे असेही मनसे चे नेते राजू उंबरकर यांनी सांगितले आहे .ते यवतमाळ मध्ये बोलत होते .