Publish Date: Sat, 03 Dec 2022 (20:51 IST)
Updated Date: Sat, 03 Dec 2022 (20:56 IST)
आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेवर बोचरी टीका केली आहे. राजू पाटील यांनी सुषमा अंधारेंना सुशी ताई म्हटलं आणि वरचा मजला रिकामाया मराठी वाक्प्रचाराचा वापर करत टीका केली. त्यांनी शनिवारी ट्वीट करत ही टीका केली. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हे ट्वीट रिट्वीट करण्यात आलं आहे.
राजू पाटील म्हणाले, “मराठीत वरचा मजला रिकामाअसा वाक्प्रचार आहे,परंतु आमच्याकडे एक सुशी ताईआहेत ज्यांच्या वरच्या मजल्यावरघनदाट अंधारआहे.”आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात,” अशी टीका राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor