शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी स्वामिनाथन समितीच्या अहवालावर देशव्यापी चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 16 जून रोजी दिल्लीत बठक होणार आहे.
या बैठकीस देशभरातील शेतकरी नेत्यांना बोलावण्यात आले असल्याची माहिती खा. राजू शेट्टी यांनी दिली. शेतकऱ्यांना उत्पादित होणाऱ्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळाला तरच शेती व्यवसाय शाश्वत होउ शकतो, हे सत्य स्वामिनाथन आयोगाच्या अहवालात अधोरेखित करण्यात आल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.