मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यानुसार नितेश राणे आणि नारायण राणे यांची मालवणी पोलीस ठाण्यात हजर झाले. नारायण राणे यांचे जबाब ५ तासांहून अधिक काळ नोंदवण्यात आला.
नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे झाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली माहिती ते योग्य वेळी सीबीआयला देतील, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. तर, राणे यांच्याकडून कोणताही गुन्हा घडला नाही तरी पोलीस त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ऍड. सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, नारायण राणे आणि नितेश राणे यांनी तपास पोलिस अधिकाऱ्यांना काही प्रश्न केले. त्यावर तपास अधिकाऱ्यांनी राणे पितापुत्र यांची उलट तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.