काही जण आपल्या देशासाठी काहीही करण्यासाठी तत्पर असतात. आपल्या देशातील सैनिक आपले कर्तव्य बजावतात .आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी तैनात असतात. आपल्या देशासाठी कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या चिमुकल्या १० महिन्याच्या मुलीला सोडून कोल्हापूरची रणरागिणी सीमेवर गेली.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मध्ये सेनेतील रणरागिणी ट्रेनच्या दारावर उभी आहे वर्षा पाटील असे या महिलेचे नाव असून ही महिला आपल्या कुटुंबियांना आणि 10 महिन्याच्या चिमुकलीला सोडून देशासाठी कर्तव्य बजावण्यासाठी निघाली आहे. हा व्हिडिओ एका ट्विटर युजरने शेअर केला आहे.