Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम खंदारे यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा

rape
, गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (21:09 IST)
शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या विरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहात एका महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा खंदारे यांच्यावर आरोप आहे.
 
या प्रकरणी एका 37 वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्तम प्रकाश खंदारे (वय 65, रा. सोलापूर), त्यांचे साथीदार महादेव भोसले, बंडु दशरथ गवळी (रा. सोलापूर) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बी रेस्ट हाऊस व बिबवेवाडीत 2012 पासून ते आतापर्यंतच्या काळात घडला आहे. अकरा वर्षानंतर महिलेने याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
 
खंदारे यांनी मुलाचा सांभाळ करतो, असे सांगून लग्नाचे आमिष दाखवत महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. तर मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक वटले नाही. तसेच महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. खंदारे हे तत्कालीन शिवसेना भाजप युतीमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री होते. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mark Zuckerberg's security allowance मेटाने मार्क झुकरबर्गचा सुरक्षा भत्ता वाढवला, जाणून घ्या किती झाली रक्कम