महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका मृत व्यक्तीविरुद्ध कथित बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितेनुसार आरोपीने १७ वर्षीय मुलीशी मैत्री केली आणि जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान तिच्यावर अनेक वेळा लैंगिक केल्याचा आरोप आहे. आरोपीने नंतर मुलीशी लग्न केले, ती गर्भवती राहिली आणि १४ फेब्रुवारी रोजी तिने एका मुलाला जन्म दिला.
आरोपीच्या मृत्यूची वेळ आणि परिस्थिती याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited By- Dhanashri Naik