बालिका शिकायला गेली नेमबाजी क्रीडा संकुलातील त्याने केला तिच्या सोबत असे केले

शुक्रवार, 24 मे 2019 (09:51 IST)
पिंपरी येथे संताप अनावर करणारी घटना घडली आहे. एक बालिका उच्च स्वप्न घेवून नेमबाजी शिकायला गेली आणि त्या मुलीला शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागेल. नेमबाजीसाठी लागणारी गन घेताना व ती पुन्हा परत देतांना प्रशिक्षणासाठी आलेल्या १२ वर्षीय खेळाडूचा विनयभंग झाला आहे. पोलिसांनी बालेवाडी क्रीडा संकुलातील व्यवस्थापकाला अटक केली असून, हा निंदनीय प्रकार १४ ते २० मे दरम्यान गन फॉर ग्लोरी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे घडला आहे. रुद्र चनवीर गौडा पाटील वय २४, रा. साई चौक, पाषाण असे अटक केलेल्या या व्यवस्थापकाचे नाव असून, पीडित मुलीच्या  आजीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बारा वर्षीय नातीने बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या गन फॉर ग्लोरी येथे नेमबाजीचा बेसिक कोर्स शिकवणी लावली होती. त्याच्या सरावासाठी ती नियमितपणे जात होती. सराव करण्यासाठी व्यवस्थापकाकडून गन घ्यावी लागत असे व ही गन घेताना सोबतच सराव झाल्यानंतर गन परत करताना व्यवस्थापक पीडित मुलीशी अश्लील चाळे करीत झोता. याबाबत मुलीने घरच्यांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर आजीने पोलिसात धाव घेतली. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख शिवसेनेच्या या जिंकलेल्या उमेदवारांना लॉटरी लागेल मोदी सरकार मध्ये