Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

हवालदाराकडून तरुणावर बलात्कार, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

Rape of a youth by a constable in Sangli
, सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (16:23 IST)
सांगलीत पोलीस खात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. सांगली येथील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर यांनी महाविद्यालयीन तरुणास प्रेम प्रकरण उघडकीस आणण्याची धमकी देत अनैसर्गिक अत्याचार केले.
 
नेमकं काय घडलं? 
27 ऑक्टोबरला पहाटे तीन वाजताच्या सुमारास हणमंत देवकर आणि एक कर्मचारी इस्लामपूर येथील एका रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना त्यांनी एका महाविद्यालयीन युवकाला अडवले. तेव्हा त्याने  आपल्या मैत्रिणीला भेटून पुन्हा वसतिगृहात जात असल्याचे सांगितले.
 
पोलिसांनी त्या युवकाकडून त्याचा फोन नंबर घेतला नंतर 29 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ येत हणमंत देवकरने त्या युवकाला फोन करुन भेटायला येण्यास सांगितले. सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास संबंधित युवक पोलिसांना भेटला. तेव्हा त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास प्रेम प्रकरण त्याच्या आणि मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी देण्यात आली. त्यावर युवकाने आपल्या मित्रांकडून चार हजार रुपये उसने घेऊन हणमंत देवकर याला दिले.
 
तेवढ्यावर न थांबता देवकर याने तरुणाकडून मैत्रिणीचा मोबाईल नंबर मागितला आणि तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग असे सांगितले. संबंधित तरुणाने असे करण्यास स्पष्ट नकार दिल्यावर देवकरने तू तसं न केल्यास तुझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवेन अशी धमकी दिली.
 
घाबरलेल्या तरुणाला देवकरने त्याच्या वसतीगृहातील रुमवर नेले आणि रुमवर असलेल्या मित्राला दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले. तिथे देवकरने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले आणि त्याची व्हिडीओ क्लिप तयार केली.
 
21 नोव्हेंबरला हवालदाराने पुन्हा युवकास फोन करुन महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले आणि शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसे न केल्यास मोबाईलमधील क्लिप दाखवून ती व्हायरल करण्याची धमकी दिली.
 
तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून हवालदार देवकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ हवालदार देवकर याला अटक केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

OnePlus 9RT भारतात नवीन नावाने लॉन्च होईल! काय खासा आहे ते जाणून घ्या