गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. गोव्यात काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा आमचा विचार असल्याचेही राऊत म्हणाले.
वेळेनुसार निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी करून हा निर्णय घेतलेला आहे. निवडणुका घेणं गरजेच आहे. जाहीर सभांवर बंदी घातली आहे, ती बंधनं सर्वांसाठी समान असावीत असेही राऊत यावेळी म्हणाले.
"प्रमोद सावंत यांना जर स्वबळावर सत्ता येईल असा आत्मविश्वास असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांपेक्षा प्रमोद सावंत मोठे नाहीत. कारण पर्रिकर होते तेव्हा 13 जागा आल्या होत्या", असा टोला राऊत यांनी लगावला.