Publish Date: Fri, 01 Oct 2021 (23:03 IST)
Updated Date: Fri, 01 Oct 2021 (23:04 IST)
आगामी नवरात्रोत्सव पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने केल्या आहेत. दुसरीकडे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नवरात्रोत्सव काळात गरबा खेळण्यास सांस्कृतिक विभागाची मान्यता असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, राज्यात तीन पध्दतीने गरबा खेळला जातो. उघड्यावर गरबा खेळायचा असल्यास सोशल डिस्टनसींग आणि मास्क बंधनकारक असणार आहे. पण सभागृहात गरबा खेळायचा असेल तर मास्क आणि सभागृहात फक्त एकूण क्षमतेच्या 50 टक्केच लोक उपस्थित राहतील याची दक्षता सभागृहाच्या मालकाने घ्यायची आहे.'
गरबा खेळादरम्यान सेवा देणाऱ्या लोकांनी म्हणजेच केटरिंग वाल्यांनी दोन्हीही डोस घेतलेले असणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनें लहान मुलांसाठी इम्युनिटी बुस्टींग किट बनवली असून लहान मुलांसाठी ती उपयुक्त ठरेल हा स्वागतार्ह निर्णय आहे असंही राजेश टोपे म्हणाले.