Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर
, गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (08:52 IST)
एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
 
सुप्रीम कोर्टानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या सीईटी सेलनं परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. या तारखा पुढीलं प्रमाणं…
 
१) पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२०
२) पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०
 
त्याचबरोबर परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे.
 
उमेदवारांनी परीक्षेसंदर्भातील ताज्या अपडेट आणि सूचना जाणून घेण्यासाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दगा फटका केल्यास जबर किंमत मोजावी लागेल : संभाजीराजे