दहावीची परीक्षा सुरु झाली असून 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूनेही परीक्षेला हजेरी लावली. रिंकू दहावीची परीक्षा देण्यासाठी अकलुजच्या जिजामाता कन्या प्रशालेतील केंद्रावर हजर झाली. यावेळी केंद्र प्रमुख मंजुषा जैन यांनी रिंकूचे स्वागत केले. सैराट सिनेमामुळे मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे रिंकूला शाळा सोडावी लागली होती. 'सैराट'च्या यशामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झालं होतं. त्यामुळे घरी अभ्यास करुन बाहेर परीक्षा देण्याचा निर्णय तिने घेतला होता. नववीत तिला ८४ टक्के गुण मिळाले होते. 'सैराट'च्या कन्नड रिमेक ह्यमनसु मल्लिगेह्ण मध्ये रिंकूने मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर मागील दोन महिन्यांत तिने दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम संपवला.