Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Road Accident : अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

accident
, बुधवार, 17 मे 2023 (14:49 IST)
Road Accident News: रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना मिरज जवळ वड्डी गावाजवळ महामार्गावर घडली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले आहे. 
 
हे सर्व जण कोल्हापुरातून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. समोरून राँग साईडहुन   विटा भरून येणाऱ्या ट्रॅक्टर ची समोरासमोर धडक झाली आणि अपघात झाला.त्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले.मृतांमध्ये एक 12 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. 
 
सदर घटना वड्डी येथे राजीवनगर बायपास ला घडली या भागात एक वीट वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलट दिशेने चालला होता बोलेरो चालकाला समोरून ट्रॅक्टर येण्याचे अपेक्षित नव्हते. दोन्ही वाहनांची अमोरासमोर जोरदार धडक झाली आणि बोलेरोतील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात 12 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. दोघे जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. 
 
या अपघातात बोलेरोची पुढचा भाग क्षतिग्रस्त झाला आहे.या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून एकाच कुटुंबातील 5 जण दगावल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली मेट्रो: दरवाजा उघडताच मुलाने मुलाला प्रपोज केले