Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माणिकखांब जवळ सशस्त्र दरोडा; "इतक्या" कोटी रुपये किमतीचा ऐवज लंपास

माणिकखांब जवळ सशस्त्र दरोडा;
, शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (20:37 IST)
इगतपुरी - मुंबई आग्रा महामार्गावर आज पहाटेच्या सुमाराला सशस्त्र दरोडा पडला आहे.
 
सोन्या चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसची इको गाडी क्र. MH 12 UJ 7948 वर पाच सहा अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. फिल्मी स्टाईलने महामार्गावरील माणिकखांब गावच्या जवळ गाडीच्या पुढे मागे गाडी आडवी लाऊन ही घटना घडली आहे.
 
ह्या घटनेत डोळ्यात मिरचीची पूड आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत ३ कोटी ६७ लाख ५५ हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला. लुटलेल्या ऐवजात १०० ग्रॅम वजनाचे ११ सोन्याची बिस्किटे, ९० किलो वजनाच्या चांदीच्या विटा, ४५ किलो वजनाचे चांदीचे दागिने समावेश आहे. ह्या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ माजली आहे.
 
घोटी पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. गोपालकुमार अशोककुमार, वय २० वर्ष, रा. किरावली जि. आग्रा उत्तरप्रदेश सध्या राहणार काळबादेवी मुंबई यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी वाडीवऱ्हेजवळ ५८ किलो सोने वाहून नेणाऱ्या वाहनाला लुटल्याची घटना घडली होती. आजच्या घटनेमुळे मागची घटना नागरिकांना आठवली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी" - सुषमा अंधारेंचा टोला