राज्याच्या महाधिवक्तापदी अॅड. रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली. तब्बल नऊ महिन्यांनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी देव यांच्या नियुक्तीची राज्यपालांकडे शिफारस करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नागपूरचे अॅड. श्रीहरी अणे यांची महाधिवक्तापदी नियुक्ती केली होती. अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर अॅड. शशांक मनोहर यांची महाधिवक्तापदी नियुक्ती झाली. त्यानंतर मनोहर यांनीही राजीनामा दिला. तेव्हापासून महाधिवक्तापद रिक्त होते.