Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोहित पवार यांनी ट्वीट करत राज्यपालांवर साधला निशाणा

rohit panwar
, शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (21:19 IST)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधानं केले आहे. यावर  छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
 
रोहित पवार यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यपालांना महाराष्ट्रा बाहेर काढा : संभाजीराजे छत्रपती