Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'भारताने पुढे जावे असे काही तत्वांना नाही वाटत, पण घाबरण्याची गरज नाही'- आरएसएस प्रमुख मोहन भागवत

mohan bhagwat
, मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (11:55 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी मोठे वक्तव्य केले. RSS प्रमुख म्हणाले की, काही तत्वांना नाही वाटत की भारत पुढे जावा. ते विकासाच्या रस्त्यावर अडचणी निर्माण करीत आहे. पण कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी देखील अशीच स्थिती होती. पण धर्मच्या शक्तीचा उपयोग करून यासोबत सामना करता आला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार संघ प्रमुख लेखक डॉ. मिलिंद पराडकर व्दारा लिखित 'तंजावरचे मराठे' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाला संबोधित करीत होते. ते म्हणाले की, धर्माचा अर्थ फक्त पूजाच नाही तर तर ही एक व्यापक संकल्पना आहे ज्यामध्ये सत्य, करुणा, तपश्चर्या सहभागी आहे. 
 
तसेच ते म्हणाले की, 'हिंदू' शब्दाचे विशेषण आहे जे विविधतांना स्वीकार करण्याचे प्रतीक आहे. व यावर जोर दिला की, भारत एका उद्देशासाठी आणि 'वसुधैव कुटुंबकम' या विचारला पुढे नेण्यासाठी अस्तित्वात आला आहे. भागवत म्हणाले की, पूर्वी भारतावर 'बाह्य' हल्ले मोठ्या प्रमाणावर दिसत होते, त्यामुळे लोक सतर्क होते, पण आता ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसू लागले आहे.
 
तसेच ते पुढे म्हणाले की, आज स्थिती तशीच आहे आक्रमण होते आहे व ते विनाशकारी आहे, मग ते आर्थिक असो किंवा अध्यात्मिक किंवा राजनैतिक. तसेच ते म्हणाले की, काही तत्व भारताच्या विकास मार्गावर बाधा निर्माण करीत आहे. व काही जागतिक व्यासपीठ याच्या उदयामुळे भयभीत आहे. पण ते यशस्वी होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र : काका अजित यांना त्यांच्याच पुतण्या युगेंद्र पवार कडून आव्हान मिळेल का?