Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुक्मिणी पुरस्कारासाठी मुक्तचे आवाहन

रुक्मिणी पुरस्कारासाठी मुक्तचे आवाहन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या सन २०१७ च्या ‘रुक्मिणी’ पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. गेल्या दशकात कृषी व ग्रामीण विकास, पर्यावरण, समाजसेवा, महिला व बालकल्याण, पत्रकारिता, प्रशासन, कला व क्रीडा आणि आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० वर्षे वयापर्यंतच्या महिलेला हा पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक महिलांनी स्वतःच्या पासपोर्ट आकराच्या फोटोसह आपल्या कार्याची संपूर्ण माहिती, फोटो, वृत्तपत्र कात्रणे, दृक-श्राव्य रेकॉर्डिंग इत्यादीसह आपला प्रस्ताव दिनांक ३० जून २०१७ पर्यंत विद्यापीठाकडे पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
रोख एकवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : डॉ. विजया पाटील, संचालक, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक - ४२२ २२२. अधिक माहितीसाठी ०२५३ - २२३०१२७, ९४२२२४७२९१ या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा, किंवा http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लीक झाला सनथ जयसूर्याचा सेक्स टेप