Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयटीच्या रडारवर

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयटीच्या रडारवर
, गुरूवार, 17 मार्च 2022 (15:29 IST)
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता आयटीच्या रडारवर आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधित साखर कारखान्याची लाचलुचपत विभाग चौकशी करत आहे.
 
हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ हे सध्या या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात सर सेनापती संताजीराव घोरपडे सहकारी साखर कारखाना आहे. प्राप्तिकर विभागाने मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थान आणि या साखर कारखान्यावरही छापा टाकला आहे.
 
२०११ मध्ये या साखर कारखान्याची स्थापना झाली. सभासदांना विना कपात पहिली उचल देणारा साखर कारखाना अशी या कारखान्याची ओळख आहे. मंत्री हसन मुश्रीफ महालक्ष्मी एक्स्प्रेसने सकाळी मुंबईहून कोल्हापूरला आले. सकाळी ते कागलमधील निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर काही वेळातच प्राप्तिकर विभागाने ही कारवाई सुरू केली. 
 
मुश्रीफ यांना भेटायला आलेल्या नागरिकांची गर्दी होती. ती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आलेल्या पोलिसांनी पांगवली आणि कारवाईला सुरुवात केली. मंत्री मुश्रीफ यांनी पदाचा गैरवापर करत साखर कारखान्याला निधी दिल्याचा आरोप ठेवण्यात आहे.  हा कारखाना उभा करण्यासाठी मुश्रीफ यांनी पदाचा गैरवापर केला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईकर उष्णतेमुळे हैराण झाले, आरोग्य सांभाळण्याचे आवाहन