Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे
, शुक्रवार, 28 मे 2021 (07:31 IST)
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 29 सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त सदस्यांचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले आहे.
 
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भातील घोषणा मराठी भाषा विभागाने नुकतीच एका शासन निर्णयान्वये केली आहे.
 
नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत
सदानंद मोरे – अध्यक्ष, डॉ. प्रज्ञा दया पवार,अरुण शेवते, डॉ.रणधीर शिंदे, श्रीमती निरजा,  प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रवीण बांदेकर, श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे, फ.मु.शिंदे, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ.रवींद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी, श्री. प्रकाश खांडगे, प्रा. एल.बी.पाटील, श्री. पुष्पराज गावंडे ,विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील, . दिनेश आवटी,धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रवींद्र बेडकीहाळ, प्रा. रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर.
 
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202105241115474433 असा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना; डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती