rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संभाजी भिडे गुरुजी यांनी शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

Sambhaji Bhide
, शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (15:54 IST)
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी  शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे (ता.महाबळेश्वर) या गावी जाऊन भेट घेतली. काल खासदार उदयनराजेंनी बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींनी भेट घेतली आहे.
 
खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण व सातारा शहरातील पालिकेच्या विविध विकासकामांसंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजी यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीतून काय घडणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.
 
याविषयी भिडे गुरुजी यांना विचारले असता त्यांनी भेटीचे कारण सांगण्याचे टाळले. सुमारे तासभर दोघांत बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत नेमके काय मुद्दे होते, याची उत्सुकता आता ताणली आहे. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

6 वर्षाच्या चिमुकलीच्या गळ्याभोवती तब्बल २ तास होता कोब्रा, जाता-जाता केला खांद्यावर हल्ला