rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊतांची सुप्रिया सुळेंवर तीक्ष्ण टिप्पणी, म्हणाले- काही लोक भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहे पण फक्त तहान लागल्याने गटाराचे पाणी पीत नाही

संजय राऊतांची सुप्रिया सुळेंवर तीक्ष्ण टिप्पणी
, गुरूवार, 29 मे 2025 (21:20 IST)
महाविकास आघाडीत सध्या काहीही चांगले चालले नाही. खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी खासदार सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की काही लोक भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहे. पण कोणीही फक्त तहान लागल्याने गटाराचे पाणी पीत नाही. संजय राऊत यांच्या तीक्ष्ण टिप्पणीमुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असे विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना तीव्रता आली. परंतु शरद पवारांच्या पक्षाने या वृत्ताचे खंडन केले. तरीही, या विषयावर पुन्हा चर्चा तीव्र होऊ लागल्या आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत गोंधळ सुरू आहे. तसेच शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज खासदार सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, काही लोक भाजपसोबत जाण्यास उत्सुक आहे. पण तहान लागल्यावर कोणीही गटाराचे पाणी पित नाही, अशी टीका संजय राऊत यांनी सुप्रिया सुळेंवर केली आहे.
शरद पवार यांच्या पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी त्यांच्या विधानावर भाष्य केले आहे. प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत मिठाचा एक खडाही फेकू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : बेकायदेशीर ड्रग्जविरुद्ध मोठी कारवाई करत विविध विभागांच्या पोलिस पथकांनी अनेकांना अटक केली