Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊतांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

sanjay raut ED
, शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (13:55 IST)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीला भेट दिली. या वेळी गडचिरोलीतील 11 सक्रिय नक्षलवाद्यानी त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. या मुद्द्यावरून विरोधक देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करत आहे. 

शिवसेना युबीटीचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. कारण राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करून घेतल्याचे प्रशंसनीय काम केले आहे. ते आता देवाभाऊ झाले आहे. 

संजय राऊतांनी गडचिरोलीच्या पूर्वीच्या पालकमंत्र्यांना फटकारले आणि आरोप केले की त्यांनी आपले एजन्ट नेमून पैसे गोळा केले या मुळे नक्षलवादाचा उदय झाला.  मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा पालकमंत्रिपद स्वीकारल्याबद्दल शिवसेना (UBT) कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, सरकारने चांगले काम केल्याने आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. 
 
शिवसेना (UBT) खासदार पुढे म्हणाले की गडचिरोलीचा विकास संपूर्ण महाराष्ट्रासाठी “चांगला” असेल. राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले काम केल्यावर त्यांचेही कौतुक केले आहे. राऊत म्हणाले, “मी नक्षलवाद्यांना शस्त्र टाकून भारतीय संविधान स्वीकारताना पाहिले आहे, त्यामुळे कोणी असे करत असेल तर त्याचे कौतुक केले पाहिजे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचा विकास झाला तर ते संपूर्ण राज्याचे भले आहे आणि ते महाराष्ट्राचे पोलादी शहर झाले तर यापेक्षा चांगले काही नाही. देवेंद्र फडणवीस असा पुढाकार घेत असतील तर त्याचे कौतुक करायला हवे. आम्ही पंतप्रधान मोदींवरही टीका केली आहे, पण जेव्हा ते काही चांगले करतात तेव्हा आम्ही त्यांचे कौतुक करतो.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: लाडकी बहिण योजनेतील डमी लाभार्थ्यांची चौकशी होणार