Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्विटरवर संजय राऊतांच्या जामीनाचा जल्लोष, राऊतांबाबतचे मिस्म, पोस्टर्स आणि व्हिडीओ ट्रेंडवर

sanjay raut
, बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:45 IST)
गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जवळपास 102 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. यामुळे राज्यभरातील शिवसैनिक हे शिवसेना भवनासह शाखांबाहेर जल्लोष करत आहेत. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद, जल्लोष साजरा केला. शिवसेना नेत्यांसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांच्या जामीनाचे स्वागत केले, यावेळी शिवसेनाचे वाघ परत आला अशी प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळाली. दरम्यान ट्विटरवरही सध्या संजय राऊतांच्या जामीनाचा जल्लोष साजरा होत आहे.
 
ट्विटर युजर्स एक से बढकर एक मिस्म सध्या ट्विट करत आहेत. Tiger is back, #सो_दाऊद_एक_राऊत, झुकेगा नहीं, तो लढला पण विकला गेला नाहीं, वाघ बाहेर, अशा अनेक घोषणा कार्यकर्त्यांकडून ऑफलाईन तर दिल्या जात आहेच, पण ऑनलाईन सुद्धा या घोषणा दिल्या जात आहेत. मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल ऑनलाईन कसं बरं घोषणा देणार?… तर मिस्म, पोस्टर्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून संजय राऊत  ट्विटवर ट्रेंड करत आहेत. संजय राऊतांचे समर्थक विविध फोटोंसब #sanjayRaut ट्रेंड करत आहेत.
 
Edited by- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकच्या सुला विनयार्ड्सचा आयपीओ येणार, सेबीने दिली मंजुरी