Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊत म्हणाले, अजून यादी मोठी आहे

sanjay raut
, शनिवार, 25 जानेवारी 2025 (15:59 IST)
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात164 जणांचा मृत्यू झाला, या हल्ल्यात दोषी ठरलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडा उद्योगपति तहव्वूर हुसैन राणा याला आता भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते.
 
युनायटेड स्टेट्स (यूएस) सर्वोच्च न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी दोषी ठरलेल्या तहव्वूर हुसेन राणाची याचिका फेटाळून लावल्याने त्याच्या भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.या वरुन आता राजकीयचर्चेला उधाण आले आहे. 

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शनिवारी सांगितले की, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. तहव्वुर राणालाअमेरिकेकडून भारतात पाठवले जाणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. आता  फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली असलेल्या नीरव मोदीला भारतात परत आणण्याची वेळ आली आहे.
संजय राऊत म्हणाले की, मेहुल चौकसी, दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनसह इतर फरारी लोकांनाही परत आणले पाहिजे.त्यांना कधी भारतात आणणार.

संजय राऊत पत्रकारांना म्हणाले, “ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. अशा न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहतात. आता नीरव मोदीला आणावे लागेल, दाऊदला आणावे लागेल, टायगर मेमनला आणावे लागेल. यादी मोठी आहे.”
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात माजी उपमहापौरांच्या मुलाची गुंडगिरी दुचाकीस्वाराला कानशिलात लगावली, गुन्हा दाखल