Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊत यांची सपशेल माघार : 'ते' वक्तव्य घेतले मागे

Sanjay Raut's withdraw his statement
मुंबई , शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (14:44 IST)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कुख्यात डॉन करीम लाला यांच्या भेटीबद्दलचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागे घेतले आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी माघार घेतली आहे. इंदिरा गांधी यांच्याबद्दल मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो, असे त्यांनी म्हटले आहे. 
 
मुंबईतील अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक भयंकर होते. त्या काळात गुंड्याला भेटायला अख्खे मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या, अस वक्तव्य राऊत यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी हे वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला होता. मात्र, त्यानंतरही वाद थांबला नाही. त्यामुळे अखेर राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.
 
खरंतर काँग्रेसच्यामंडळींनी माझे वक्तव्य मनाला लावून घेण्याची गरज नव्हती. मी आजवर अनेकदा इंदिरा गांधी यांच्या भूमिकांचे समर्थन केलेले आहे. तरीही माझ्या वक्तव्याने इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला तडा गेला असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kashmir: मोदी सरकारचे 36 मंत्री जम्मू-काश्मीरला आता का जात आहेत?