पत्राचाळ गैर व्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडी ने 31 जुलै रोजी अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आज न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. 31जुलै
रोजी ईडीने संजय राऊतांना अटक केल्यानंतर तुरुंगात ठेवले होते नंतर त्यांना सुरुवातीला 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. नंतर त्यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत नंतर पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ करून त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. आता 14 दिवसांची मुदत संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्या कोठडीत 19 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.