Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार?

sanjay raut
, मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (08:31 IST)
शिवसेनेचे (उबाठा) राज्यसभा खा. संजय राऊत हे ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. यावर आता संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
 
राऊत म्हणाले, आम्ही बाळासाहेबांसोबत काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज, पक्षाचा आदेश जो असेल ते मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. पक्षाने आदेश दिला तर आम्ही काहीही करतो, तुरुंगातही जातो. ईशान्य मुंबईत संजय राऊत सोडून द्या, साधा शिवसैनिक जरी उभा राहिला तरी दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होईल.
 
दरम्यान, ईशान्य मुंबईत सध्या भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत. त्यामुळे राऊत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास कोटक आणि राऊत असा सामना होऊ शकतो. या मतदारसंघात किरीट सोमय्या यांचेही प्राबल्य आहे. त्यामुळे थेट किरीट सोमय्या देखील संजय राऊत यांच्या विरोधात असतील. राऊत हे चौथ्यांदा राज्यसभेवर खासदार आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाणे : घरोघरी अधिकारी अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदारयादी पडताळणी