महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी यांच्या युतीबद्दल गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.ठाकरे बंधूंच्या युतीला बद्दल आता संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, "ठाकरे बंधू लवकरच एका व्यासपीठावर एकत्र येऊन युतीची घोषणा करतील." तसेच माहिती समोर आली आहे की संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
राज्य निवडणूक आयोगाने नुकताच मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या प्रमुख शहरांमध्ये मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोडक्यात युतीची चर्चा आणि तयारी सुरू आहे, मात्र घोषणेची नेमकी तारीख अजून निश्चित झालेली नाही. संजय राऊत यांनी 'लवकरच घोषणा होईल' असे संकेत दिले आहे.
Edited By- Dhanashri Naik