Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

सारा तेंडुलकरच्या अकाऊंटवरून शरद पवारांवर टीका

सारा तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या साराच्या नावाने ट्विटरवर फेक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
 
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यांनी केंद्रालाही लुटायचा प्रयत्न केला, हे फारसे जगगाहीर नाही असे ट्विट या अकाऊंटवरून 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. विजय मल्ल्याने शरद पवरांचे नाव घेतल्याच्या चर्चांवरून हे ट्विट करण्यात आल्याचा अंदाज आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून याबाबत सचिन तेंडुलकरला माहिती दिली आहे.
 
हे फेक अकाऊंट कोणाचे आहे, ते शोधून तक्रार करावी, असेही आव्हाडांनी सांगितले आहे. फेक अकाऊंटवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आव्हाडांनी दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, राहुल गांधी, शिवसेना, सीताराम येचुरी अशा अनेकांवरही टीका करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराटमुळे युवराज, रैना बाहेर: कमाल खान