Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘सारथी’ सेवेद्वारे 18 फेब्रुवारी पासून विविध परवाने देण्याचे काम सुरु

sarthi
, शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (10:49 IST)
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 18 फेब्रुवारी पासून सारथी 4.0 ऑनलाईन प्रणालीवरुन नवीन पक्के लायसन्स देण्याचे, जुन्या पक्क्या लायसन्समध्ये नविन वाहन संवर्गाची नोंद, लायसन्स नूतनीकरण, लायसन्सची दुय्यम प्रत देणे,पत्ता बदल, नाव बदल  आदी कामकाज करण्यात येणार आहे.
 
परिवहन कार्यालयामार्फत  18 जानेवारी पासून सारथी 4.0 या ऑनलाईन प्रणालीद्वारे शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) देण्यास सुरवात करण्यात आली होती. अर्जदारांनी  https://parivahan.gov.in या संकेतस्थळावर सारथी  सेवेची निवड करुन आपला अर्ज ऑनलाईन भरावा तसेच आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड व ऑनलाईन शुल्क भरुन तसा अर्ज कार्यालयात सादर करावा.ज्या अर्जदारांकडून इंटरनेट व ऑनलाईन शुल्क भरण्याची सोय उपलब्ध नाही अशा अर्जदारांनी कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी-ई गव्हर्न्स प्रा.ली)  या केंद्राद्वारे लायसन्स संदर्भातील अर्ज व ऑनलाईन शुल्क भरु भरावे. अर्जदाराने या केंद्रावर  विहीत शुल्क रोख स्वरुपात भरल्यानंतर केंद्रचालक त्याचे व्हॅलेटद्वारे अर्जदाराचे ऑनलाईन शुल्क भरणार आहेत. सीएससी केंद्र चालकास ही सेवा पुरविण्यासाठी शासनाने अर्जदाराचे विहीत शुल्काव्यतिरिक्त अर्जदाराकडून वीस रुपये शुल्क घेण्याची परवानगी दिलेली असून अर्जदारास अर्ज शुल्काव्यतिरिक्त  शुल्काची पावती मिळणार आहे. नाशिक कार्यालयाचे कार्यक्षेत्रामध्ये शहर,तालुका व गावस्तरावर सध्या 300 च्या वर सीएससी केंद्रे सुरु असून आपल्या जवळच्या सीएससी केंद्राची माहिती नागरिकांना http://www.apnacsconline.in/csc-locator/ या संकेतस्थळावरुन देखील उपलब्ध होईल.तरी लायसन्स संदर्भात कोणत्याही कामासाठी अर्ज करतांना वरील प्रमाणे कार्यवाही करुनच अर्जदारांनी कार्यालयात हजर रहावे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी  आवाहन केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेची दिशाभूल करून भाजप सत्तेवर - धनंजय मुंडे