Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

सेल्फी काढत असतानाच पाय घसरला

satara tourist collapsed in Mahabaleshwar
, शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (09:17 IST)
महाबळेश्वर येथील लॉडविक पाँईट येथून सेल्फी घेताना विनोद शकंर जाधव (भिवंडी) हे १५०ते २००फुट दरीत कोसळले. आपल्या मित्रांसमवेत आलेले विनोद शंकर जाधव (रा. भिवंडी मुंबई) लॉडविक पॉईंट वर पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी विहंगमय दृश्य व खोलवर असणाऱ्या दरी पाहून विनोद जाधव यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. धोकादायक ठिकाणी कठड्याच्या किनारी जाऊन विनोद सेल्फी काढत होते. सेल्फी काढत असतानाच विनोद जाधव यांचा कठड्यावरून पाय घसरला आणि ते 200 ते 300 फूट खोल दरीत कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. 
 
अचानक विनोद दरीत कोसळल्याने मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी त्‍या ठिकाणी असणार्‍या पर्यटकांनी विनोद यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटना कळताच महाबळेश्व ट्रेकर्सचे जवान घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्‍यांनी विनोद जाधव यांना बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे तिकीट बुकींगसह साई दर्शनाचे तिकीट बुक करा