Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सतेज पाटलांमध्ये हिंमत असेल तर स्वतः समोर येऊन उत्तर द्यावं : शौमिका महाडिक

satej patil
, बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (07:47 IST)
कोल्हापूर : काल वृत्तपत्रांच्या माध्यमातून संघाचे नेते घटलेले संकलन आणि विक्री याबाबत चिंता व्यक्त करत असल्याचे वाचण्यात आले. आज तेच लोक संघ कसा फायद्यात आहे हे पटवून देत आहेत, ही बाब मुळात हास्यास्पद आहे. हा विरोधाभास लक्षात न येण्याएवढी जनता दूधखुळी नाही. सत्तांतर होऊन दोन वर्ष झाली तरीही महाडिकांचे टँकर आणि जावयाचा ठेका या पलीकडे विचार न करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. एकीकडे दूध संघाची स्वतःच्या कुकर्माने वाताहत केलेली असताना, अजूनही वैयक्तिक आरोपांमध्ये धन्यता मानणाऱ्या लोकांकडून मुळातच दुसरी अपेक्षा नव्हती, अशा शब्दात शौमिका महाडिक यांनी सतेज पाटलांवर निशाणा साधला.
पत्रकारांसमोर येण्याचे धाडस नसल्यानेच विद्यमान चेअरमन साहेबांना वेठीस धरून ‘जबरदस्तीने’ त्यांच्या सहीचे पत्रक सतेज पाटलांनी प्रसिद्धीस दिले आहे. मी केलेले आरोप जर खोटे असतील तर आजही माझं खुलं आव्हानं आहे की , सतेज पाटलांनी कधीही एका व्यासपीठावर सामोरासमोर यावं . पत्रकारांसमोर , लाइव्ह मीडिया समोर सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी स्वतः हे आव्हानं स्वीकारावं.
मुळात कोणाच्या जावयांचा किंवा पै-पाहुण्यांचा ठेका आहे का हा माझ्या पत्रकार परिषदेचा मुद्दाच नव्हता . तरीही सवयी प्रमाणे जाणूनबुजून पै-पाहुण्यांवर घसरायचंच असेल तर संजय डी. पाटलांच्या मेहुण्याला कोणता ठेका दिला गेला? विद्यमान चेअरमन – संचालक यांच्या पै-पाहुण्यांकडे किती ठेके आहेत? कोणाचे किती पै-पाहुणे गोकुळ मध्ये नोकरीला लावले गेले? राधानगरी वाहतूक संघ किंवा शेतकरी संघ या नावांखाली कोणाच्या किती गाड्या गोकुळला लावल्या आहेत ? पॅकिंग किंवा वितरण व्यवस्था बदलताना कोणते नेते किंवा अधिकाऱ्यांनी काय percentage ठरवून दिलेले आहे? जाहिरातींचा ठेका असेल किंवा नवीन नोकऱ्या असतील या साठी कोणी कोणाच्या माध्यमातून किती पैसे खाल्ले? या सर्व गोष्टींचा खुलासा देखील मी करू शकते . पण वैयक्तिक टीका न करता संघ कसा टिकेल यावर आजही माझा भर आहे , याचं भान सर्वच सत्ताधारी नेत्यांनी ठेवावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक शहरातील रस्ते होणार काँक्रिटचे; महापालिका आयुक्तांचा निर्णय