Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बूथ व मंडल यंत्रणा अधिक सक्षम करा! ‍ - सौंदान सिंह

बूथ व मंडल यंत्रणा अधिक सक्षम करा! ‍ - सौंदान सिंह
नाशिक , मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (17:16 IST)
भाजपाची बूथ आणि मंडलस्तरावरील यंत्रणा अधिक सक्रिय आणि सक्षम करा. पक्षाचे संघटन  मजबूत झाले तर कोणत्याही निवडणुका सहजगत्या जिंकता येतात, असा कानमंत्र भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री सौंदान सिंह यांनी दिला.

नाशिक दौर्‍यावर आलेले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री सौंदान सिंह यांनी नाशिकला भेट दिल्यानंतर  नाशिकरोड येथील बूथ नं.२३८, द्वारका मंडलाची पाहणी करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या, कल्पना जाणून घेतल्या. यानंतर भाजपाचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि विविध आघाड्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना सौंदान सिंह बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.रामदास आंबटकर,चिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष सुनिल बागूल, वसंत गिते, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, महानगर अध्यक्ष आ.बाळासाहेब सानप, आ.प्रा.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, ज्येष्ठनेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, काशिनाथ शिलेदार, संभाजी मोरूस्कर, उद्धव निमसे आदी होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्ल्यू व्हेल गेममुळे मुंबईत पहिला बळी