Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मॅट्रीकपूर्व केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना आता ऑफलाईन पद्धतीने

मॅट्रीकपूर्व केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना आता ऑफलाईन पद्धतीने
, गुरूवार, 24 जून 2021 (07:40 IST)
कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध पातळ्यांवर निर्बंध आहेत. त्यामुळे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचा शासननिर्णय नुकताच नियोजन विभागाकडून काढण्यात आलेला आहे.
 
इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने गठित केलेल्या समितीने मान्य केल्यामुळे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेतून वगळण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202105241247441916 असा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगली बातमी! ही लस कोरोनाव्हायरसचे प्रत्येक म्युटंटचा नायनाट करेल