महाराष्ट्रात शाळांना सलग ५ दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु ही सुट्टी मकर संक्रांत आणि महानगरपालिका निवडणुकांमुळे काही ठराविक भागातच लागू असेल. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच १५ जानेवारीला ज्या ठिकाणी महानगरपालिका निवडणुका आहे म्हणजेच मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व इतर २९ शहरे फक्त त्याच भागात ही अधिकृत सार्वजनिक सुट्टी असेल.
तसेच १४ आणि १५ जानेवारीला लागोपाठ सुट्ट्या असल्याने, १६ जानेवारी शुक्रवारची रजा घेतल्यास किंवा शाळांनी ती जाहीर केल्यास सलग ५ दिवस सुट्टी मिळू शकते. तर अनेक शाळांचे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असल्याने किंवा शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने स्थानिक प्रशासन किंवा शाळा व्यवस्थापन ही सुट्टी जाहीर करू शकते. तसेच ही सुट्टी सर्व जिल्ह्यांसाठी अनिवार्य नाही.
१४ जानेवारी-मकर संक्रांत (शासकीय सुट्टी)
१५ जानेवारी-महानगरपालिका निवडणूक मतदान (सार्वजनिक सुट्टी)
१६ जानेवारी-जोडून येणारी सुट्टी (अनेक शाळा स्थानिक स्तरावर सुट्टी देऊ शकतात)
१७ जानेवारी-तिसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
१८ जानेवारी-साप्ताहिक सुट्टी
Edited By- Dhanashri Naik