शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतींना पालकांशी चर्चा करुन ठराव करावा लागणार आहे. तसंच विशेष नियमांच्या आधारे शाळा उघण्यात येणार आहेत.
शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना टप्प्याटप्पयाने शाळेत बोलवण्यात येणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग या कोरोना त्रिसुत्री बरोबरच विद्यार्थ्यांनी इतर नियम देखील पाळणे आवश्यक आहे. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. तसंच दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. अशाप्रकारे एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी बसू शकतील. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये लक्षणे आढळल्यास त्याला घरी पाठवण्यात येतील. त्यानंतर लगेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल.
शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी त्याच गावात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिक्षकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी लागू नये, यासाठी काळजी घेण्यात येणार आहे.