Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांची

भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांची
, सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (19:43 IST)
बीड : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यात पोहचली आहे. दरम्यान, शेतकरी, तरुण बेरोजगार आणि महिलांचे प्रश्न जाणून घेतल्यानंतर रोहित पवार यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली असून, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. मंत्री, छगन भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती. त्यामुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
 
दरम्यान यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, लोकांमध्ये मराठा आणि ओबीसी असा कोणताही वाद नाही. मात्र, राजकीय नेत्यांकडून हा वाद लावला जात आहे. सर्वसामान्य मराठा किंवा ओबीसी यात सहभागी नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी हा वाद सुरू झाला असून, भुजबळ मोठे नेते असतांना देखील अशाप्रकारे बोलत आहे. तर, भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना फडणवीसांनी ओबीसी सभेला जाण्यापासून रोखले असावे, असेही रोहित पवार म्हणाले. तर, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची ताकत फडणवीस कमी करत आहेत. सोबतच, भाजप भुजबळ यांना संपवण्याचा डाव आखत असल्याचे देखील, पवार म्हणाले.
 
ओबीसीचे राजकीय आरक्षण भाजपनेच रोखून धरले आहे
स्थानिक निवडणूका होत नसल्याच्या मुद्यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, ‘भाजपच्या काही लोकांमुळेच ओबीसीचे राजकीय आरक्षण गेल, तर, बीडमध्ये झालेल्या जाळपोळीत सरकारमधल्या मोठ्या नेत्याचा हात होता. भाजपचे काही लोकं न्यायालयात गेल्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले. त्यामुळे, भाजप यात राजकारण करत आहे. भाजप हे यामध्ये लक्ष विचलित करण्यासाठी राजकारण करत असून, ओबीसी राजकीय आरक्षण भाजपनेच रोखून धरला असल्याचे,’ पवार म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठरला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त