Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

नागपूरच्या रुग्णालयात जीबीएसमुळे दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू

नागपूरच्या रुग्णालयात जीबीएसमुळे दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू
, शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (16:23 IST)
सध्या देशभरात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात सर्वाधिक संसर्ग आणि मृत्यू पुण्यात झाले आहे. महाराष्ट्रात जीबीएसच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून महाराष्ट्रात आता पर्यंत जीबीएसच्या रुग्णांची संख्या 207 वर पोहोचली आहे. 
आता पर्यंत नागपुरात देखील जीबीएसचे 10 रुग्ण आढळले आहे. या पैकी एकाचा मृत्यू झाला.तेव्हा पासून रुग्णांची संख्या कमी झाली मात्र रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचाराधीन असलेल्या जीबीएसच्या रुग्णाचा मृत्यू झाला असून आता नागपुरात जीबीएस मुळे मृत्युमुखी झालेल्याची संख्या दोन झाली आहे. मेडिकलच्या आयसीयू मध्ये दाखल असलेल्या एका 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यांनतर डॉक्टर देखील सतर्क झाले आहे. 
या पूर्वी मेडिकल मध्ये 8 आणि मेयो मध्ये 1 रुग्ण दाखल झाला होता.सर्व रुग्णांना प्रकृतीत सुधारण्यांनंतर डिस्चार्ज देण्यात आले. मात्र एका 8 वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर झाली त्याला आयसीयू  मध्ये दाखल करण्यात आले मात्र एक महिन्यांनंतर त्याचा मृत्यू झाला. आता 11 फेब्रुवारी रोजी, पारडी येथील रहिवासी असलेल्या 55 वर्षीय रुग्णाला न्यूमोनिया झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.परंतु शुक्रवारी त्यांचे निधन झाले. आता नागपुरात मृतांची संख्या दोन झाली असून डॉक्टर देखील सतर्क झाले आहे. 
संसर्गाची शक्यता टाळता यावी म्हणून लक्षणे असलेल्या रुग्णांवर आरटीपीसीआर चाचणी करावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि घशाच्या संसर्गाने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, जीबीएसची सुरुवातीची लक्षणे देखील सारखीच असतात. नंतर त्याचे न्यूमोनियामध्ये रूपांतर होते.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद कायदा आणणार, 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले