Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेल्फी साठी निर्लज्जपणा बेचिराख मैदानावर सेल्फी

सेल्फी साठी निर्लज्जपणा बेचिराख मैदानावर सेल्फी
, रविवार, 30 ऑक्टोबर 2016 (09:54 IST)
एक दिवसापुर्वी महराष्ट्रात औरंगाबाद येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाके दुकाने फुटून महाभयंकर असे अग्नितांडव घडलं होते. यामध्ये सुमारे ४० गाड्या आणि २०० दुकाने आगीने जाळ्यात ओढले होते. अनेकांचे संसार या दुकानावर अवलबून होते. मात्र लोकांनी या ठिकाणी निर्लज्ज पणाचा कळस केला आहे. 
आता हे बसम झालेले ठीकान स्थानिकांसाठी सेल्फी पॉईंट झालं आहे. स्थानिक रहिवाशी दुर्घटनेच्या ठिकाणी येऊन मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढण्यात सुटले आहे. लहान मुलं मैदानावर विखुरलेले फटाके गोळा करण्यासाठी गर्दी करत आहेत.त्यामुळे हे भयानक नुकसान मोठे की सेल्फी हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 
दुसऱ्याच्या नुकसानीवर असे फोटो कसे काढले जातात असे लोक विचारात आहेत. 
 
खरं तर फटाका मार्केट आगीत जळून खाक झाल्यानंतर प्रशासनानं परिसर सील करून बचावकार्य करणं अपेक्षित होतं. मात्र, प्रशासनानं त्या दृष्टीनं कोणतीच पाऊल उचललेली दिसत नाही. दरम्यान औरंगाबादकरांच्या या असंवेदनशीलतेवरही सर्व स्तरातून टीका होते आहे. बहर वस्तीत असे गाळे असताना आणि इतके ज्वलनशील असताना मनपा प्रशासकीय कोणतीच काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे हे २ ते २.५ कोटींचे नुकसान समोर आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न - संग्राम कोते पाटील