Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेल्फी चा तिढा पालिकेने सोडवला तिन्ही पक्षाना परवानगी

सेल्फी चा तिढा पालिकेने सोडवला तिन्ही पक्षाना परवानगी
, शुक्रवार, 3 मार्च 2017 (15:14 IST)

दादरमधील सेल्फी पाँईट वादावर अखेर मुंबई महापालिकेनेच चांगलाच  तोडगा काढला आहे. मनसे, भाजप आणि शिवसेना या तीनही राजकीय पक्षांना शिवाजी पार्कातच सेल्फी पॉईंटसाठी जागा देण्याचा निर्णय, मुंबई महापालिकेने घेतला आहे.प्रत्येकी 50 फुटांच्या अंतरावर तीनही पक्षांचे सेल्फी पॉईंट असतील. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी पराभूत झाल्यावर दादर येथील सेल्फी ठिकाण काढून टाकले होते, त्यानंतर भाजपने येथे आम्ही सेल्फी स्टेशन उभारू असे सांगितले लगेच शिवसेनेन सुद्धा सेल्फी पाँईट उभारू असे सांगितले आणि वाद सुरु झाला आता, हा वाद मिटवायचा कसा हे मिटवण्यासाठी सर्वाना मनपाने परवानगी दिली आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षणमंत्र्यांची भूमिका विद्यार्थीविरोधी -राष्ट्रवादी