Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भा ज पा जेष्ठ नेते यांचे दीर्घ आजाराने बाणेर यथे निधन

laxman padurang
, मंगळवार, 3 जानेवारी 2023 (14:43 IST)
पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. 
 
पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली ३५ वर्षे  चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. 
 
आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. एप्रिल २०२२ पासून त्यांची तब्बेत खालावत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. ३ एप्रिल रोजी पुन्हा ते मायदेशी परतले. दिवाळीच्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक होत झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेरपर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Cold wave in Maharashtra महाराष्ट्रात थंडीची लाट