Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्षा निवासस्थानी भेटींचे सत्र, राज भेटीनंतर काँग्रेसचे तीन बड्या नेतेही भेटीला

raj thackeray shinde
शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (20:40 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर काँग्रेसचे तीन बड्या नेतेही मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले . राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि अमिन पटेल यांचा समावेश आहे. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
राज ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोघांमध्ये जवळपास दीड ते दोन तास चर्चा झाली. आरोग्यविषयक मुद्द्यांसदर्भात ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे यांनी तीन वेळा मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे.
 
राज ठाकरे यांच्यनंतर काही तासांनी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड,काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि अमिन पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  हे तीन काँग्रेस नेते आपापल्या मतदार संघाच्या विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीस आल्याचे म्हटले जातेय.

Edited By -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pro Kabaddi League : बंगाल वॉरियर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यात सामना