नाशिक : मैत्रीचे नाटक करून महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी साजिद शफिक शेख (वय 25) याने फिर्यादी महिलेसोबत मैत्रीचे नाटक केले.
त्यानंतर तिला विश्वासात घेऊन त्र्यंबकेश्वर येथील एका लॉजवर व त्याच्या राहत्या घरी पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले, तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
हा प्रकार दि. 1 जानेवारी 2020 ते दि. 31 डिसेंबर 2023 या कालावधीत घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन फिर्यादी साजिद शेख याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.