Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदेंना सुरक्षा न देण्याबाबत वर्षावरून शंभूराजे देसाई यांना फोन आला

एकनाथ शिंदेंना सुरक्षा न देण्याबाबत वर्षावरून शंभूराजे देसाई यांना फोन आला
, शुक्रवार, 22 जुलै 2022 (16:06 IST)
एकनाथ शिंदेंना सुरक्षा न देण्याबाबत वर्षावरून शंभूराजे देसाई यांना फोन आला होता असा गंभीर आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला. त्यांच्या या आरोपावरून राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान शंभूराजे देसाई आणि सतेज पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सुहास कांदेंच्या आरोपाला देसाई यांनी दुजोरा दिला आहे.
 
काय म्हणाले शंभूराजे देसाई
 
एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालक मंत्री असताना नक्षलवाद्यांनी एक पत्र पाठवले होते. या पत्रात बदला घेतला जाईल. त्यांच्यासह त्यांच्याकुटुंबाला संपवणार असल्याची धमकी देण्यात आली होती. हे पत्र विधानपरिषदेत गृहखात्याकडे देण्यातं आलं होतं. याविषयी सखोल चर्चा ही करण्यात आली होती. त्या पत्राचे तथ्थ बाहेर काढू आणि गरज पडली तर कुटुंबासह त्यांना विशेष सुरक्षा वाढवली जाईल असे सांगण्यात आले होते. जेव्हा या पत्रातील सत्यता पडताळली गेली तेव्हा तथ्थ समोर आलं. त्यानंतर तातडीने राज्याचे पोलिस महासंचालक, लाॅर्ड अधिकारी, एसआयडी कमिशनर, गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी यांची बैठक मुंबईत बोलवण्यात आली होती. याच दरम्यान आढावा घेत असताना सव्वा आठच्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. शिंदेंना सुरक्षा देण्याची गरज नाही असं त्यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती दिली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Monkeypox: जगभरात मंकीपॉक्सची 14000 प्रकरणे, आफ्रिकेत पाच लोकांचा मृत्यू