Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकार शेतीचे अर्थकारण संपुष्टात आणतेय- शंकर अण्णा धोंडगे

सरकार शेतीचे अर्थकारण संपुष्टात आणतेय- शंकर अण्णा धोंडगे
मागील तीन वर्षांपासून शासनाच्या रडारवर राज्यातील शेतकरी आहेत. शेतीचे अर्थकारण संपुष्टात आणण्यासह शेतकऱ्यांना भिकारी करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्याक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी केली आहे. राष्ट्रवादी किसान सभेतर्फे ऑगस्ट क्रांतिदिनापासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवाग्राम ते नाशिकदरम्यान शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान यात्रा काढण्यात येत आहे. यानिमित्ताने आज मठपिंपळगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे शेतकरी, शेतमालाच्या यांची महासभा झाली.
 
शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार केवळ पोकळ आश्वासनांची खैरात करण्यासह फसव्या घोषणा करत असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना जे निर्णय घेतले होते, ते सर्व निर्णय या सरकारने बदलून टाकले आहेत, अशी टीका धोंडगे यांनी केली. 
 
व्यावसायिकांप्रमाणे शेतकऱ्यांनादेखील तारण जमिनीच्या मूल्यांकनाच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून द्यावे, आर्थिक, सामाजिक सुरक्षा कायदा करून शेतकऱ्यांचे उत्पन्न किमान चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांइतके सुरक्षित करा आदी मागण्यांसाठी हे अभियान सुरु केल्याचे धोंडगे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशी होती अय्याशी बाबाची गुहा